‘अनेक संकटे आली पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली’; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

मुंबई : राज्यावर कोरोना संकट आहेच यानंतर लगेच पावसाचे संकट उद्भवले. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले कि, महाराष्ट्रावर गेले अनेक दिवस एकापाठोपाठ एक संकटे येत आहेत, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिंमत दाखवली आहे असे म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती. येथे बोलतानाच शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा