InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

तोडफोड करणारे मराठा आंदोलक नव्हते : पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद

९ ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या वेळी औरंगाबादमधील वाळूज येथे औद्योगिक परिसरात तोडफोड प्रकरणाला पाच दिवस होत आहे. तोडफोड करणारे मराठा आंदोलक नव्हते असे औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र बंद दरम्यान मराठा आंदोलनात बाहेरील व्यक्तींनी घुसखोरी केली असल्याची तक्रार क्रांती पोलीस चौकीत करण्यात आली आहे. मात्र नेमकं घुसखोरी करणारे कोणत्या चळवळीशी संलग्न आहे याबाबतचा तपास चालू असल्याचं देखिल चिरंजीव यांनी म्हतलं आहे.

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

Sponsored Ads

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.