InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बीडमध्ये 701 मुलींचे होणार सामुहिक नामकरण

दिवंगत झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने यंदाच्या सोळाव्या कीर्तन महोत्सवाला ता. 31 डिसेंबरला सुरुवात होत आहे. सावता माळी चौकात राधागोविंद इस्कॉन मंदीर परिसरात मंडपाची उभारणीचे काम सुरु आहे. दरम्यान, यंदाच्या महोत्सवात 701 मुलींचे सामुहिक नामकरण केले जाईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम होणार असून पालकांनी मुलींची नोंद जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये करावी असे आवाहन संयोजकांनी केले.

31 डिसेंबरला सुरु होणारा हा किर्तन महोत्सव 10 जानेवारीपर्यंत चालणार आहे. महोत्सवात दररोज दोन सांप्रदायिक कीर्तने होतील. तसेच श्रीमद्‌ भागवत कथाही होणार आहे. महोत्सवात 701 मुलींचा सामुहिक नामकरण सोहळा, सामुदायिक विवाह सोहळा, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, विविध शैक्षणिक उपक्रम, महिला अत्याचार विरोधी प्रबोधन महारॅली, संक्रांतीनिमित्त हळदी कुंकूवाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

Loading...

ता. पाच जानेवारीला सकाळी नऊ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने “बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमातंर्गतर्गत नामकरण सोहळा होईल. या सोहळ्यात ता. एक सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत जिल्हा रुग्णालय तसेच या रुग्णालयाच्या अधिनस्त असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या मुलींचे नामकरण केले जाणार आहे. नोंदणीसाठी जन्मप्रमाणपत्र सोबत आणावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, संयोजक कीर्तनकार भरतबुवा रामदासी आदींनी केले.

कन्यारत्नांच्या सामुहिक नामकरण सोहळ्याची परंपरा तीन वर्षांपासून सुरु आहे. यापूर्वी पार पडलेल्या या नामकरण सोहळ्याची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून यंदाच्या सोहळ्याचीही नोंद घेतली जावी असे नियोजन आहे. सोहळ्यात मुलींच्या मातांचा फेटा बांधून, साडी-चोळीचा आहेर देत ओटी भरत सन्मान केला जाणार आहे तर मुलींना पाळणा व खेळणी भेट दिली जाणार आहे.

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.