आंदोलन होणारच; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही संभाजीराजे आंदोलनावर ठाम !

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. याच मुद्दयावर आज (१७ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. संभाजीराजे छत्रपती यांनी या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद घेऊन या बैठकीविषयी माहिती दिली.

यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सतेज पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक यांची महत्वाची बैठक पार पडली आहे.

संभाजीराजे या पत्रकार परिषदेत म्हणाले की, “नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढची दिशा ठरवली जाईल. सरकारशी देखील चर्चा सुरु आहे. मात्र, मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही

.”दरम्यान, ही महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर संभाजीराजेंप्रमाणेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निकालाबाबत राज्य सरकार येत्या आठवड्याभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा