InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आमच्या काळात तयार केलेल्या रस्त्यांवर पुढील २०० वर्ष तरी खड्डे पडणार नाही – गडकरी

मोदी सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर पुढील २०० वर्षे खड्डे पडणार नाही, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केला आहे.

रस्ते तयार करताना आम्ही गुणवत्तेसोबत, कंत्राटदारांसोबत कोणतीही तडजोड करणार नाही. त्यामुळे मोदींच्या सत्ताकाळात तयार झालेले रस्ते दीर्घकाळ टिकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जे काम गेल्या ७० वर्षांमध्ये झालं नाही, ते आम्ही ५ वर्षांमध्ये केलं, असं म्हणत त्यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला लगावला. अयोध्येत पाच प्रकल्पांच्या भूमीपूजनानंतर ते बोलत होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.