InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

…म्हणून निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा प्रतिसाद मिळाला – शरद पवार

“जनमानसात जाऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना समजून घेतल्याने निवडणुकीत मोठा प्रतिसाद मिळाला,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचं वर्णन केलं. विधानसभा निवडणूक निकालानंतर बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर शरद पवार एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. तसंच शिवसेना आणि भाजपचा सरसकट पक्षांतराचा कार्यक्रम जनतेला पटला नसल्याचंही शरद पवार म्हणाले.

पक्षांतराचा कार्यक्रम जनतेला पटला नाही
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपची मेगाभरती सुरु होती. मात्र पक्षांतराचा कार्यक्रम जनतेला पटला नसल्याचं शरद पवार म्हणाले. “शिवसेना आणि भाजपचा सरसकट पक्षांतराचा कार्यक्रम जनतेला पसंत पडला नाही. त्यांची नाराजी मतदानाच्या रुपाने होईल याची मला खात्री होती. मोजके लोक सोडले तर बहुतांश जणांचा पराभव झाला. लोकांना पक्षांतर आवडत नाही. 15 वर्ष सत्तेत राहता, काम करता, सत्तेशिवाय पाच वर्ष राहता येत नाही, भूमिकेशी कटिबद्ध राहत नाही, हे जनतेला आवडत नाही, अशा शब्दात पवारांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केला. तसंच जे गेले त्यांना आमच्या शुभेच्छा, त्यावर जास्त भाष्य करण्याची आवश्यकता नाही. त्याची नोंद सामान्य जनता घेते, त्यात आपण मेहनत घेण्याची गरज नाही, असं पवार म्हणाले.

Loading...

भाजपला 370चा फायदा झाला, पण शेती, रोजगार महत्त्वाचे विषय
विधानसभा निवडणुकीत भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेतील महत्त्वाचा मुद्दे हे कलम 370 आणि पुलवामा हल्ला होते. याविषयी विचारला असता शरद पवार म्हणाले की, भाजपला कलम 370 आणि पुलवामा हल्ला याचा फायदा झाला. पण शेती, शेतकरी, शेतकरी आत्महत्या, बंद पडलेले कारखाने, त्यामुळे बुडालेले रोजगार या गोष्टी सामान्यांना महत्त्वाच्या वाटत होत्या. कारण त्या दैनंदिन आयुष्याशी निगडित आहेत. त्याकडे दुर्लक्ष होऊ नये असं त्यांचं मत होतं आणि ते निवडणुकीच्या माध्यमातून समोर आलं.

सत्तेपेक्षा शेती, बेरोजगारीची अधिक चिंता
राज्यासाठी पुढची उत्तम फळी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पवारांनी सांगितलं. सत्तेपेक्षा शेती, राज्यातील उद्योग, बेरोजगारीची अधिक चिंता वाटते. कारखानदारी, तरुणांचे रोजगार टिकवण्यावर भर असेल, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.