‘… त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे खरे शिल्पकार देवेंद्रजी असतील’ : चंद्रकांत पाटील

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार ओबीसी आरक्षणाच्या विषयावर मंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

‘राज्य मागासवर्गीय आयोगाला बोलावून इम्पेरिकल डेटा जमा करायचा. तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊ नये, या भूमिकेवर सर्वपक्षांचं मतैक्य घडवण्यात आमचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका निर्णायक आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश येईल आणि त्याचे शिल्पकार देवेंद्रजी असतील. हे निश्चित’, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने झालेल्या पक्षीय बैठकीनंतर ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील आधीपासूनच ओबीसी आरक्षणावर आपलं मत स्पष्ट केलं होतं. त्यामुळे ठाकरे सरकार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक असल्याचं दिसून येतंय.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा