शिल्पाच्या घरी क्राईम ब्राँचची छापमारी करत विचारले हे 10 प्रश्न

मुंबई : पॉर्न व्हिडिओ प्रकणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्याोगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राची 27 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अशातच आता शिल्पा शेट्टी हिला पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं आहे.

शिल्पाच्या घरात क्राईम ब्राँचने छापेमारी देखील केली आहे. छापेमारीनंतर पोलिसांनी शिल्पाची चौकशी केली. यावेळी शिल्पाला 10 प्रश्न विचारण्यात आले आहेत. सर्वात आधी तर वियन कंपनी चांगली कमाई करत होती तसेच शेअर मार्केटमध्ये देखील या कंपनीचे भाव उच्च होते तर ही कंपनी सोडण्याचा निर्णय का घेण्यात आला?, असा सवाल विचारला गेला.

हाॅटशाॅट या अॅपबद्दल तुम्हाला माहिती आहे का?, या अॅपवर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडीओंविषयी तुम्हाला माहिती आहे का?, या व्यवहारात तुम्ही देखील शामिल आहात का?, राज नेमका काय व्यवसाय करतो याची तुम्हाला माहिती होती का?, तसेच राज तुम्हाला आपल्या आर्थिक व्यवाहाराबद्दल माहिती देतो का? हे देखील विचारण्यात आलं.

दरम्यान, पाॅर्न व्हिडीओ लंडनला पाठवण्यासाठी वियान कंपनीच्या ऑफिसचा वापर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का?, वियान आणि कॅमरिन या दोन कंपनीमधल्या व्यवहारबाबत माहिती का? प्रदीप बक्षीसोबत तुम्ही कधी या अॅपबाबत चर्चा केली आहे का? असा प्रश्नही शिल्पाला क्राईम ब्राँचने विचारला. शिल्पाला विचारण्यात आलेला अखेरचा प्रश्न म्हणजे पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हाॅट्स अॅप चॅट आणि ई-मेल बाबत काही माहिती आहे का?, असे प्रश्न विचारून शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा