‘हे’ आहेत IPL 2020चे नवे नियम ; 14 दिवसांत खेळाडूंना कराव्या लागणार 4 कोरोना चाचण्या

टी-20 वर्ल्ड कप के स्थगित झाल्यानंतर बीसीसीआय संपूर्ण जोशात आयपीएल-2020च्या तयारीला लागली आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता अखेर 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळात युएइमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत नियम कडक असणार आहे. बीसीसीआयनं यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करणार आहे. लवकरच सर्व खेळाडूंना ही नियमावली पाठवण्यात येणार आहे.

BCCIच्या नव्या नियमांनुसार बायोसेफ्टी सुरक्षा खेळाडूंना पुरवण्यात येणार आहे. या अंतर्गत खेळाडू कोणतेही नियम मोडू शकत नाही. तसेच, खेळाडू आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला सोबत ठेवू शकतात की नाही, याबाबत विचार सुरू आहे.

‘ही’ बँक ग्राहकांसाठी देणार WhatsAppवर 24 तास सेवा ; मेसेजवर करू शकता ‘ही’ कामं

तसेच, खेळाडूंना 14 दिवसात चारवेळा कोव्हिड-19 चाचणी करावी लागणार आहे. पहिल्या दोन चाचण्या या युएइ जाण्याआधी करण्यात येणार आहेत. त्यानंतर युएइमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर कराव्या लागणार आहेत.

पुण्याच्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतील घोळ ; अ‍ॅक्टिवसह बाधितांच्या आकड्यातही तफावत

संघांना एकवेळा हॉटेल निश्चित करून दिल्यानंतर त्यांना हॉटेल बदलण्याची मुभा नसेल. बीसीसीआय निर्णय घेईल की कोविड चाचणीत निगेटिव्ह आलेले केटररच खेळाडूंना जेवण देतील.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.