‘त्यांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता’; चंद्रकांत पाटलांकडून दरेकरांची पाठराखण

मुंबई : लावणी सम्राज्ञी आपल्या लावलीने रसिकांना साद घालणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे.“राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला.

तसेच पुढे “या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती. यानंतर आता मात्र दरेकरांच्या या वक्तव्यावर राज्यातील राजकारण चांगलाच पेटलय. तसेच प्रविण दरेकरांना टीकेचा सामना करावा लागत आहे. दरेकरांविरोधात राष्ट्रवादी महिला आक्रमक झाल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी हे महिलांचा अपमान करणारं वक्तव्य आहे, असं म्हटलं होतं. प्रविण दरेकरांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. महिलांचा अपमान करणाऱ्यांचा गाल रंगवू शकतो, असा इशारा रूपाली चाकणकरांनी दिलाय.त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रविण दरेकरांच्या वक्तव्याचा अर्थ अश्लिल नव्हता तर बोलीभाषेत ते बोलून गेले, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच प्रविण दरेकरांच्या वाक्याचा गाजावाजा करण्याची गरज नाही. आपण दररोजच्या बोलण्यात असे वाक्यप्रचार वापरतो. त्यामुळे उगीच पराचा कावळा करू नये, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा