“…त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावं लागेल”

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे . लसीच्या पुरवठ्यावरुन महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार आमने सामने आले आहेत. महाराष्ट्राला लसीचा मुबलक पुरवठा होत नाही. त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवतोय. तर लसीअभावी अनेक ठिकाणची लसीकरण केंद्र बंद पडली. यावर आज सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे . लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे .

कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचं पार्सल घेऊन यावं, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे.

राजकीय भांडणे आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचा जीव का घ्यायचा? महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलंच होतं ना. तेवढे तरी इमान राखा. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही, अशा शब्दांत राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारलं आहे.

कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललं आहे. पण संकटाचं भान न ठेवता यानिमित्त जी राजकीय हुल्लडबाजी सुरू आहे ती महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारी नाही. महाराष्ट्रात कोरोनावरील लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला व यामागे महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा