‘विश्वासघात मूलमंत्र असलेले शिवसेनेवर विश्वास असल्याचं सांगतायत; त्यांनी खंजीर चिन्ह वापरावं’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काल २२ वा वर्धापन दिन. काल मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष योग्य मार्गाने चालत असल्याचे म्हणत २०२४ मध्ये आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल’, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे, विश्वासघात हाच ज्यांच्या राजकारणाचा मूलमंत्र राहिला ते शिवसेनेवर लोकांचा विश्वास असल्याचे सांगतायत. खरंतर या दोन्ही पक्षांनी खंजीर हे निवडणूक चिन्ह ठेवायला काय हरकत आहे? असा सवाल करत भातखळकर यांनी पवारांवर टिका करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा