यांच्यासारख्यांना समाजातूनच हाकलून दिले पाहिजे – जितेंद्र आव्हाड

MIM चे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी हे विधान भाजपच्या सांगण्यावरून केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यांच्यासारख्यांना समाजातूनच हाकलून दिले पाहिजे, असे म्हणत त्यांनी पठाण यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे.

तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही पठाण यांचे हे विधान अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले आहे. १५ कोटी आहेत पण १०० कोटींवर भारी आहेत, असे वादग्रस्त विधान एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केले.

महिलांना पुढे केले जात आहे, असा आरोप होतो. नुसत्या आमच्या सिंहणी बाहेर पडल्या तर तुम्हाला घाम फुटला आहे. आम्ही एकत्र आलो तर काय होईल, याचा विचार करू शकता, असे खळबळजनक विधान वारिस यांनी केले आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.