‘बाला वो बाला’ गाण्यावर थिरकला द ग्रेट खली; व्हिडीओ झाला व्हायरल

डब्लूडब्लूइच्या रिंगमध्ये भारताचे नाव गाजवणारा द ग्रेट खली सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे त्यामुळे तो इन्स्टाग्रामवर सध्या चांगलाच ऍक्टिव्ह राहत आहे. त्याने नुकताच सोशल मीडियावर डान्स करतानाचा त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हाउसफुल-4’ मधील ‘बाला वो बाला’ या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

धिप्पाड रेसलर आपल्या वेगळ्याच तालेत गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळत आहे. डान्सच्या त्याच्या स्टेप पाहून अनेकांना हसू आवरनार नाही. पण काही चाहते त्याच्या या प्रयत्नाला दाद देतानाही पाहायला मिळाले. चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटल्या आहेत.

खलीने मजेदार व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील त्याचा असा हटके अंदाज चाहत्यांनी पाहिला आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटातील बाला हे गाणे खूपच लोकप्रिय असून अनेक कॉरिओग्राफर वेगवेगळ्या पद्धतीने हे गाणे सादर करताना पाहायला मिळत आले आहे. खली त्याच्या वेगळ्याच अंदाजात गाण्याचा आनंद घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा