‘आई कुठे काय करते’ मालिकेतून ‘हा’ कलाकार घेणार ब्रेक

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने अत्यंत कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र आता मालिकेतील एक लोकप्रिय कलाकार यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याचं समजतंय.

मालिकेच्या कथानकानुसार यश हा परदेशी जाणार आहे. त्यामुळे काही काळासाठी तो या मालिकेत दिसणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. अभिनेता अभिषेक देशमुख याने मालिकेत अरुंधतीच्या मुलाची भूमिका साकारली आहे. यश सध्या लंडनमध्ये असून त्याने मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. म्हणूनच मालिकेच्या कथानकात तो परदेशी गेल्याचं दाखवणार आहेत.

अभिषेक खऱ्या आयुष्यात विवाहित असून त्याची पत्नी कृतिका देव हीसुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिषेक आणि कृतिका २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकले. अभिषेकची ऑफस्क्रीन बहीणसुद्धा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा