…यामुळे शमिताला मागावी लागली मायशाची माफी

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असणारा रियॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’चे नाव येते. सध्या या रियॅलिटी शो चा 15 वा सीझन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये एक खेळ खेळण्यात आला होता. त्यात सहभागी झालेल्या शमिताला एका कारणामुळे मायशाची माफी मागावी लागली आहे.

त्या खेळामध्ये घरवाले आणि जंगलवाले असे दोन गट करण्यात आले होते. जंगलवासी यांनी डाकूची भूमिका करत घरवासी यांना लक्ष्य केले. या दरम्यान झालेल्या वादामध्ये मोठी भांडणे बिग बॉसच्या घरात झाली. यावेळी शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट हे मायशा अय्यरचे शूज घेऊन बाहेर गेले. त्यांना काही करुन घराबाहेर करण्याचा प्लॅन होता. त्यामुळे शमितानं स्टोअर रुममध्ये जाऊन मायशाचे शूज पेंट केले. त्यामुळे ती नॉमिनेट झाली.

टास्क पूर्ण झाल्यानंतर शमितानं मायशा अय्यरशी बातचीत केली. त्यामध्ये तिनं सांगितलं की, मला माहिती होतं की, तू खूप रागालेली आहे. मला माहिती आहे कुणी दुसरी व्यक्ती जेव्हा आपल्या पादत्राणांना हात लावते त्याचा राग येणं साहजिकच आहे. यावरुन शमिताला तिची चूक कळली. आणि तिनं मायशाची माफी मागितली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा