भाजपच्या रणांगणातून ‘हि’ महत्त्वाची व्यक्ती गायब ; आंदोलनात सहभाग नाही

कोरोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने राज्यभर ‘माझे अंगण, माझे रणांगण’ हे आंदोलन केलं. मात्र भाजपच्या रणांगणातून नाराज नेत्या पंकजा मुंडे या गायब झाल्या आहेत, अशी चर्चा आहे. काल त्यांनी भाजपच्या आंदोलनात सहभाग घेतलेला दिसत नाही. किंबहुना त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर दिसत नाहीयेत.

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या रद्द करण्याचा सरकारचा निर्णय

पक्षावर नाराज असलेले विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, मेधा कुलकर्णी ते काल परवा पर्यंत भाजपवर आसूड ओढणारे एकनाथ खडसे यांच्या हातात ‘उद्धवा अजब तुझे सरकार’चे पोस्टर दिसले. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याची टीका केली. परंतू या आंदोलनात मात्र पंकजा मुंडे कुठेच दिसल्या नाहीत. त्यांनी आंदोलनात न घेतलेला सहभाग यातून बऱ्याच गोष्टी सूचित होतात.

Loading...

निलेश राणेंनी रोहित पवारांना दिली शेंबड्या पोराची उपमा

पंकजा मुंडे यांच्याबरोबर त्यांच्या भगिणी प्रीतम मुंडे यांनी देखील भाजपच्या आंदोलनात सहभागा घेतला नव्हता, असं चित्र समोर आलं आहे. कारण दोन्ही बहिणींचा एकही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाहीये किंवा त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी देखील सोशल मीडियावर फोटो टाकलेला नाहीये.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.