पूरग्रस्तांसाठी विजय वडेट्टीवार यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापुरामुळे घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकार तातडीने मदत करणार आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पूरग्रस्त चिपळूणची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी तातडीने मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मदितीची घोषणा केली. मुसळधार पावसामुळे राज्यातील आठ पेक्षा जास्त ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या. यापैकी

रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळई गावाचं प्रचंड नुकसान झालं. या दुर्घटनेत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर गावात 15 तर मिरगावात 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा