हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका

मुंबई : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुणे मेट्रो, कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून महाविकास आघाडी व ठाकरे सरकारवर टीका केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करून यावर प्रतिक्रिया दिलीय.

ट्विटमध्ये भातखळकर म्हणाले कि, पुण्यामध्ये गेले महिनाभर पॉजिटिव्हीटी रेशो हा 4 टक्के पेक्षा ही खाली असताना देखील केवळ भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची भावना पुणेकरांमध्ये निर्माण होत आहे. राज्य सरकारने अशा प्रकारे दुजाभाव करणे हे रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा