‘हा तर लोखंडवालाचा टपोरी आहे’; अतरंगी लूकमुळे रणवीर सिंग पुन्हा ट्रोल

मुंबई : बॉलिवूडचा ‘एनर्जी बॉय’ अभिनेता रणवीर सिंग हा नेहमी चाहत्यांसोबत सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असतो. तसेच रणवीर त्याच्या अतरंगी अशा ड्रेसिंग स्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. मात्र या अतरंगी फॅशनमुळे रणवीरला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. पुन्हा एकदा रणवीरने त्याची हटके स्टाईल दाखवली आहे.

यावेळेस रणीवरचे एकदम हटके असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरने GUCCI चा हिरव्या रंगाचा ट्रॅकसूट, हेअर बँड, गळ्यात मोत्यांची माळ आणि डोळ्यांवर मोठा पांढरा गॉगल अशा हटके लूक केलेला दिसत आहे. रणवीरने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यानंतर त्याचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून काहीजणांनी त्याचे कौतुक केले आहे तर काहींनी ट्रोल केले आहे.

रणवीरच्या या फोटोंवर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी कॉमेन्ट केल्या आहेत. एका युझरने लिहिले आहे, ‘सर तुम्ही एवढे विचित्र लूक कसे करतात हो..,’, तर आणखी एका युझरने लिहिले आहे, ‘अरे हा तर लोखंडवालाचा टपोरीच की…’, आणखी एका युझरने लिहिले, ‘ आईशप्पथ! आता मोत्याची माळ गळ्यात…’, अशा विविध पद्धतीने सोशल मीडियावर युझर्सनी रणवीरच्या फोटोंवर कॉमेन्ट केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा