‘हे तर लव्ह जिहाद आहे दीदी’; केआरकेने पुन्हा कंगणाला डिवचलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केआरके कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीला ट्रोल करताना दिसतो. केआरकेने आता बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतच्या खासगी आयुष्यावर कमेंट केली आहे.

केआरकेने कंगनाविषयी एक ट्वीट करत दावा केला की कंगना इम्रान नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सोबतच त्याने लव्ह जिहादसाठी कंगनावर निशाना साधला आहे. एवढंच नाही तर केआरकेने कंगनाचे दोन फोटोही शेअर केले होते, त्यात कंगना एका पुरुषासोबत दिसत आहे.

त्या दोघांच्या फोटो शेअर करत ‘ब्रेकिंग न्यूज-कंगना रणौत इम्रान नावाच्या एका इजिप्तच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ताई हे तर लव्ह जिहाद आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,’ अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे. मात्र, काही वेळातच केआरकेने हे ट्वीट डिलीट केलं.

केआरकेने जे फोटो शेअर केले आहेत. त्या व्यक्तीसोबत कंगनाने देखील फोटो शेअर केला आहे. कंगनाने २८ जुलै रोजी हा फोटो शेअर केला होता. त्या फोटोत तिच व्यक्ती दिसत आहे. मात्र, कंगनाने त्या व्यक्तीचे नाव रिझवान असल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा