InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

…..हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे गंभीर व चिंतेचे कारण आहे – पृथ्वीराज चव्हाण

रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी काल राजीनामा दिला. यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भुमिका मांडली. ‘लोकशाहीतील सर्व संस्था हस्तगत करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, व अर्थमंत्री जेटली सरकारचा प्रयत्न आहे. त्यामध्ये रिझर्व्ह बॅंकही अलिप्त राहिलेली नाही.’

‘सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजकीय लोकांना रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळावर नेमणे, हा या सरकारचा उद्देश आहे त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेचे आतापर्यंत चार वित्त सल्लागार सोडून गेले आहेत. आंतरराष्ट्रीय तज्ञ मोदी आणि जेटलींच्या हाताखाली काम करण्यासाठी तयार नाहीत हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे गंभीर व चिंतेचे कारण आहे’, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply