राष्ट्रवादी काँग्रेसचा हा नेता गिरीश महाजनांसंदर्भात करणार गौप्यस्पोट !

जामनेर : मतदारसंघाचे २५ वर्षांहून अधिक काळापासून नेतृत्व करणारे भाजपचे ‘वजनदार’ नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या विषयी येत्या महिनाभरात ‘गौप्यस्फोट’ करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा जिल्ह्याचे राजकारण तापणार असे दिसत आहे.

जामनेर येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, जिल्हाउपाध्यक्ष विलास राजपूत, डॉ. प्रशांत पाटील, संदीप हिवाळे, राजू नाईक, प्रल्हाद बोरसे, विनोद माळी, पुंडलिक पाटील आदी पदाधिकारी होते.

यावेळी भाजपच्या विज वितरण विभागाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाबाबतही टिका करण्यात आली. भाजप- सेनेच्या काळातील कारभारामुळेच विजकंपनीवर मोठे कर्ज झाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनीही दोनदा पत्रकार परिषद घेऊन मोठे घबाड बाहेर काढण्यासह बहुचर्चित ‘सीडी’चा उल्लेख केला होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा