‘हा’ खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर !

आजपासून(3 जानेवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. मात्र या सामन्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला. त्यांचा सलामीवीर फलंदाज रॉरी बर्न्स दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून तसेच उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला गुरुवारी सराव सत्राआधी फुटबॉल खेळताना दुखापत झाली आहे.

जान्हवी कपूर असा सांभळते फिटनेस !

त्याचाच परिणाम म्हणून त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. त्याने या मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्याने इंग्लंडकडून पहिल्या सामन्यात दोन्ही डावात मिळून सर्वाधिक 93 धावा केल्या होत्या. इंग्लंडसाठी त्याचे मालिकेतून बाहेर पडणे हा दुसरा धक्का आहे.

२० मीटरचं अंतर पार केलं तरी आपला देश बदलेल – सुबोध भावे

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही दुसऱ्या कसोटी सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. इंग्लंडने बर्न्सऐवजी दुसऱ्या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात जॅक क्रॉलेला तर आर्चर ऐवजी डॉमनिक बेसला संधी दिली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.