वाढदिवसानिमित्त अंकिताकडून बॉयफ्रेंड विकी जैनला ‘ही’ खास भेट

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतच अंकिताने तिच्या बॉयफ्रेंड विकी जैनचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचा एक खास व्हिडिओ अंकिताने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सध्या या व्हिडिओनो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

या व्हिडिओमध्ये अंकिता विकिला ॲपलचे एयरपॉड्स गिफ्ट करतांना दिसत आहे. अंकिताने व्हिडिओ शेअर करत “येणारवर्ष तुझ्यासाठी खास आहे आणि ते माझ्या सोबत आहे. मी वचन देते की मी तुझ्या सुखात आणि दु:खात सदैव तुझ्या सोबत राहीन.” असं कॅप्शन दिलं आहे. सध्या सगळीकडे अंकिताच्या या व्हिडिओची तसेच अंकिताने दिलेल्या स्पेशल गिफ्टची चर्चा रंगत आहे.

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. ‘पवित्र रिश्ता’ व्यतिरिक्त अंकिता ‘एक थी नायका’ आणि ‘शक्ति-अस्तित्व के एहसास’ यांसारख्या मालिकेत देखील झळकली आहे. गेल्या वर्षी अंकिताने कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘बागी ३’मध्ये दिसली होती.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा