InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

यंदाही विधानसभेच्या जागा भाजप सोडणार नाही- रावसाहेब दानवे

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात 50-50 फॉर्म्युला ठरलेला आहे. मात्र गेल्यावेळी भाजपने जिंकलेल्या 123 जागांपैकी एकही जागा भाजप सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतला आहे.

सेना-भाजप मित्रपक्ष असले तरी गेल्या निवडणुकीत भाजपाने 123 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. ज्या जिंकलेल्या जागा आहेत त्या सोडल्या जाणार नाहीत. ज्या जागांवर पराभव झाला त्याठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर कोणता पक्ष असेल त्या जागा समन्वयाने एकमेकांना सोडणार आहे असं दानवेंनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्रिपदावरून थेट भाष्य न करता मुख्यमंत्री कोण होणार याची चिंता तुम्ही करु नका. शिवसेना-भाजपात मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलेलं आहे. ते आम्ही ते तुम्हाला सांगणार नाही असं रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं.

 

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या

समाजमाध्यमांवरील धमक्यांविरोधात सचिन सावंतांची तक्रार

मायावतींचा अखिलेश यादवांवर शाब्दिक हल्ला

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी दिला राजीनामा  

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.