InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘या दोनअभिनेत्री’ करणार ‘कॉफी विथ करण’चा ‘हॅप्पी एंडिंग’

अभिनेत्रींमध्ये असणारे वाद हे काही नवे नाही.मात्र आपल्यातला वाद मिटवण्याची एक संधी करण जोहर या दोन अभिनेत्रींना देणार आहे. या अभिनेत्री म्हणजेच प्रियांका चोप्रा-जोनास आणि करिना कपूर खान .

‘ऐतराज’ या चित्रपटात एकत्र काम केलेल्या या दोन्ही अभिनेत्रींमध्ये ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातूनच वादाला सुरूवात झाली होती. ‘कॉफी विथ करण’नच्या आधीच्या सिझनमध्ये करिनानं प्रियांकाच्या उच्चारांची खिल्ली उडवली होती. करिनाचं उपरोधिक बोलणं प्रियांकाला खूपच खटकलं होतं.

मात्र आता या दोघींनी सारं काही विसरून नव्यानं सुरूवात करण्याचं ठरवलं आहे. ‘कॉफी विथ करण’च्या सहव्या सिझनचा फिनाले लवकरच प्रदर्शित होणार आहे. शेवटच्या भागाचं चित्रिकरण पार पाडलं असून करणनं स्वत: इन्स्टाग्राम अकाऊंटवर करिना प्रियांकासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply