“…यामुळे भारतीय व्यक्तींचं स्वीस बँकेमधील गौडबंगाल कधीच उघडीस येणार नाही”

मुंबई : काँग्रेस खाजदारांकडून विदेशातील काळ्या पैश्यांसंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गेल्या 10 वर्षांत भारतातील किती व्यक्तींनी किती काळा पैसा स्वीस बँकेत जमा केला, याची कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडे उपलब्ध नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी हे लेखी स्वरूपात संसदेत दिली आहे. यावरून आता शिवसेनेनं सामानातून टीका केली आहे.

“काळे धन किती आणि गोरे किती, याविषयी कुठलीही माहिती स्वीस बँका कधीच देत नाहीत. ज्या धनावर त्या बँका मालामाल होत आहेत, त्यांचा देश संपन्न होत आहे, ती माहिती जगजाहीर करून आपला धंदा म्हणा किंवा व्यवसाय स्वीस बँका का ठप्प करतील? मुळात या प्रश्नाचे खरं उत्तर कोणालाच नको असतं. हवी असते ती फक्त अवाढव्य आकड्यांच्या आरोपांची राळ आणि खळबळ. त्यामुळे स्वीस बँकांमध्ये भारतीय व्यक्तींनी किती काळा पैसा दडवून ठेवला आहे, याचे गौडबंगाल कधीच उघडकीस येत नाही,” असं शिवसेनेनं म्हंटल आहे.

“भ्रष्ट मार्गाने कमावलेला आणि स्वीस बँकांमध्ये लपवून ठेवलेला हा काळा पैसा भारतात वापस आणू आणि तो पैसा परत आणल्यानंतर देशातील नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करू, अशी आश्वासने दिली जातात. लोकही या जुमलेबाजीवर विश्वास ठेवतात, पण ते देखील एक गौडबंगालच राहते आणि सामान्य माणूसही ते आश्वासन पूर्ण ‘होणार नाही’ अशी स्वतःची समजूत करून घेतो,” असा टोला शिवसेनेनं सामानातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा