InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मावळ लोकसभा: यंदा शिवसेनेचा बाण पार्थ पवार रोखणार..?

मावळ लोकसभा मतदार संघात यंदा तिसरी निवडणूक पार पडत आहे. २००९ साली निर्माण झालेल्या या मतदार संघात सलग दोनवेळा शिवसेनेचा भगवा फडकला. पण यंदा मात्र मावळ मतदारसंघात शिवसेनेला मात देणार ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार.

तसेच काही दिवसांपूर्वी मावळ लोकसभा मतदार संघातील कार्यक्रमात अजित पवारांसोबत पार्थ मंचावर दिसू लागला होता. शरद आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांवर असो की नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांवर पार्थ पहिल्यांदाच झळकला. एका मागे एक घडणाऱ्या घडामोडी पार्थ पवारच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत आहेत. त्यामुळे यंदा शिवसेनेच्या बाणाला रोखायला पार्थ पवार राष्ट्रवादीचे घड्याळ जोरात पळवणार.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी निर्धार परिवर्तन यात्रेत तसे संकेत दिले आहेत. शरद पवार आणि अजित पवार हे तुमच्यासाठी झिजलेत, आता त्यांना देण्याची वेळ आली आहे, तर मावळ लोकसभेसाठी त्यांना आशीर्वाद द्या, असं ‘हात’ जोडून मुंडेंनी जाहीर आवाहन केलं. पण पार्थ पवार यांनी धनंजय मुंडे यांना दिलेल्या उत्तरावरून ते यावर्षी मावळ मतदारसंघातून लोकसभा लढणार कि नाही हा एक प्रश्नच आहे

काय म्हणाले होते पार्थ पवार ?

“मला असं वाटतं मावळमध्ये मला पहिली दोन वर्ष काम करायला पाहिजे. लोकांना भेटून इथली परिस्थिती, अडचणी नीट समजून घ्यायला हवं. त्यानंतर माझा निवडणुकीला उभं राहायचा प्लॅन होता. पण तुम्ही आताच या असा लोकांचा आग्रह आहे. मी जर उभं राहिलो तर सगळे एकत्र येतील, काय हरकत नाही. दादांचं म्हणणं आहे की तू आला तरच सीट येणार. त्यामुळे बघूया, पक्ष काय म्हणतोय. मावळमध्ये मला उभा राहायचंच आहे असं माझं काही नक्की नाही. पुढच्या इलेक्शनला उभा राहिलो तरी चालतंय. माझा एकच मुद्दा आहे की इकडचे मुद्दे समजून घ्यायचे आहेत. लोकांना भेटायचे आहेत, इथे विकास कसा आणायचा त्यापद्धतीने मला काम करायचं आहे.

त्यामुळे २०१९ लोकसभा निवडणूक पार्थ पवार लढणार की  पुन्हा एकदा मावळ मतदारसंघात शिवसेनेची हॅट्रिक होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.