पदावर बसलेले लोक तारतम्य बाळगत नाहीत; शरद पवारांचा राज्यपालांवर पुन्हा हल्लाबोल

उस्मानाबाद : काल दिवसभर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेलं होत. कारण एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा सुरु होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उस्मानाबाद दौरा सुरु होता. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या दोन्ही ठिकाणि लागलेलं होत. उस्मानाबादमध्ये शरद पवार यांनी येथील कार्यक्रमात बोलताना विविध मुद्यावर भाष्य केलं.

तसेच यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीला जे सोडून गेले ते सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असं म्हटलं. तर पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमधून झालेलं पक्षांतर, उस्मानाबादचा पाणी प्रश्न, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य, देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावर शरद पवारांना टोले मारले. तर, उद्धव ठाकरे चांगला राज्य कारभार चालवत आहेत, असं शरद पवार म्हणाले.

पवार म्हणाले कि, कधी कधी पदावर बसलेल्या लोकांना पदाचे तारतम्य राहत नाही. लोक मला विचारतात यांचं काय करायचं? मी म्हणतो सोडून द्या. हे राज्य पुढे नेण्यासाठी कोणाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा हे ठरवायला हवे. ज्या छत्रपतींचा उल्लेख आपण केला त्या शिवछत्रपतींचं आयुष्य जिजाऊंनी घडवलं. कर्तृत्वाचा वसा पुरुषांनी नाही तर स्त्रियांनी जपला आहे. सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात रमाबाईंचं कर्तृत्व महत्त्वाचं आहे. ज्यांनी भारताला घटना दिली, त्यांच्यापाठी रमाबाई उभ्या राहिल्यामुळे त्यांना ते करता आले, असे शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या