विधानपरिषद निवडणूका : जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल, अजित पवारांचं वक्तव्य

मुंबई : राज्यसभेच्या अनपेक्षित विजयानंतर आता भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत भाजपने सेनेचा पराभव करत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राज्यसभेतील पराभवानंतर आता विधान परिषदेसाठी आघाडीने कंबर कसली आहे. यादरम्यान या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी रणनीती ठरली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. अपक्षांना काही लोकांनी फोन केला, संख्या कमी पडत असल्याने अपक्षांना मदतीसाठी फोन केल्याचे पवार यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळं दिसेलचं. ११ पैकी १० निवडून येणार आहे, एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्याबाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल, असंही यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा