सरकार कोसळावे म्हणून देव पाण्यात ठेवणारे स्वतःच पाण्यात जातील; वडेट्टीवारांचा पलटवार

मुंबई : २०१९ ला शिवसेनेने भाजपसोबत युती तोंडात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत राज्यात महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र आता भाजपच्या केंद्रीय नेत्यानेच राज्यात सत्तांतर होण्याचं सूचक विधान केलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार अधिक काळ टिकणार नाही, असं विधान भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी केलं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा डीएनए वेगळा आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली. त्यामध्ये लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या बाजूने कौल दिला. मात्र तरीही शिवसेनेने भाजपला धोका देत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडी सरकार बनवत मतदारांना धोका दिला आहे. हे सरकार किती दिवस टिकते हे आम्ही पण पाहत असून जास्त दिवस टिकेल असे वाटत नसल्याचे रवी यांनी स्पष्ट केले.

आता यावर सी.टी.रवी यांचा काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला आहे. आमच्याकडे ज्योतिषी नाही, त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते त्यांचा अंदाज वर्तवत असतात. पण हवमाना खात्यासारखं त्यांचं ज्योतिष्य आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती आधार आणि महत्व द्यायचं…सरकार जाणार असं म्हणून दोन वर्ष केली पण सरकार टिकलं आहे आणि पुढेही टिकेल. पण सरकार जावं म्हणून देव पाण्यात बुडवून बसणारे स्वतःच पाण्यात जातील, असं म्हणत वडेट्टीवारांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा