कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणाऱ्यांचा सोशल मीडियावर सहा कोटी खर्च; राम कदमांचा अजितदादांना टोमणा

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यावर टीका करताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी टीका करताना म्हटले. कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे महावसुली सरकार सोशल मीडियासाठी सहा कोटी रुपये खर्च करायला निघाले आहे. ‘कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे महावसुली सरकार सोशल मीडियासाठी सहा कोटी रुपये खर्च करायला निघाले आहे.

उपमुख्यमंत्र्यांसाठी सहा कोटी, तर अशा डझनभर मंत्र्यांसाठी किती पैसे खर्च केले जाणार आहेत. लोकांच्या घामाचा पैसा स्वतःची वाहवा करण्यासाठी वापरला जाणारा आहे. या सरकारची प्राथमिकता काय आहे? असा सवाल राम कदम यांनी केला आहे. राम कदम यांचे ट्विट कोरोना संकटामुळे उत्पन्नाचे स्रोत आटून राज्य सरकारला आर्थिक चणचण जाणवत आहे.

तिजोरी रिकामी असल्यामुळे गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. त्यामुळे अनेक विकासकामे आणि उपक्रम अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल सहा कोटी रुपयांचा दौलतजादा केल्याचे उघड झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा