घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेणाऱ्यांना काहीच कळणार नाही ; प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

“अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात जर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर भाजपा टोकाची भूमिका घेऊन सरकार विरोधात संघर्ष करेल,” असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. “आघाडी सरकारचे मंत्री घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेत आहेत. पण घरात बसून त्यांना काहीच कळणार नाही,” असा टोलाही दरेकरांनी लगावला.

प्रवीण दरेकर सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. तिथेच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.“आघाडी सरकारचे मंत्री घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेत आहेत. पण घरात बसून त्यांना काहीच कळणार नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या गावात गेले, तरच समस्या कळतील आणि त्यावर उपाययोजना होतील.

शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा मानसिकतेत आहेत. त्यांना धीर आणि दिलासा देण्यासाठी शासनाने पावले उचलावीत. जी काही मदत द्यायची ती वेळेत द्यावी. आता रब्बीची पेरणी तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी उभारणी मिळेल,” असेही दरेकर म्हणाले

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.