InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

डॉक्टरांना धमकावणे, दमदाटी करण्याच्या ५५० घटना

- Advertisement -

डॉक्टरांवर हल्ले होत असल्याने त्यांच्या संरक्षण मिळण्याची मागणी आता वैद्यकीय क्षेत्रातून जोर धरू लागली आहे. गेल्या वर्षात महाराष्ट्रात डॉक्टरांवरील हल्ल्याच्या ५४ घटना, तर पुण्यात डॉक्टरांना धमकावणे, दमदाटी करण्याच्या सुमारे ५५० घटना घडल्या आहेत. त्यापैकी सुमारे दहा वेळा डॉक्टरांवर हल्ले झाल्याची नोंद इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेने केली आहे.

- Advertisement -

‘आयएमए’ने पुकारलेल्या संपामध्ये शहरातील स्पेशालिस्ट डॉक्टर, रुग्णालये, स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना, नेत्रतज्ञ संघटना आदी विविध संघटनांनी २४ तास ओपीडी बंद ठेवली,’ असा दावा आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

या वेळी राज्य शाखेचे नियोजित अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा, डॉ. अविनाश भूतकर, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. आरती निमकर आदी उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.