InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

10 हजारात तीन कॅमेऱ्याचा फोन

- Advertisement -

भारतीयांमध्ये सध्या तीन कॅमेरा असलेल्या फोनची क्रेझ वाढली (Motorola One Macro Launch) आहे. नुकतंच Motorola कंपनीने 3 कॅमेरा असलेल्या एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Motorola one macro असे या नव्या स्मार्टफोनचे नाव असून याची किंमत फक्त 9 हजार 999 रुपये (Motorola One Macro Launch) आहे. येत्या 12 ऑक्टोबरपासून या फोनची विक्री सुरु होणार (Motorola One Macro Launch) आहे.

Motorola कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये एक micro कॅमेरा दिला आहे. या कॅमेऱ्याद्वारे तुम्ही कोणत्याही वस्तूचा फोटो रेग्लुअर लेन्सच्या तुलनेत 5x जास्त चांगले शूट करु शकता. यात 4000mAh बॅटरी सोबतच ऑक्टा-कोअर MediaTek Helio P70 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Loading...
Related Posts

लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, शरद…

या फोनचा फक्त एक वेरियंट लाँच करण्यात आलं आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोअरेज देण्यात आले आहे. या फोनची किंमत भारतात फक्त 9 हजार 999 रुपये आहे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवरुन तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. या स्मार्टफोनच्या लाँच ऑफरसोबत जिओद्वारे 2200 रुपयांचा कॅशबॅक आणि 125 जीबी अतिरिक्त डेटा दिला जाईल.

- Advertisement -

ड्युअल सिम सपोर्ट असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 19:9 Aspect ratio सोबत 6.2 इंच HD+ (1520X720) डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Android 9 Pie सपोर्ट सिस्टम देण्यात आलं (Motorola One Macro Launch) आहे. यात 4GB DDR4 रॅम, 64GB स्टोअरेज आणि Mali-G72 900Mhz GPU सोबत 2.0GHz ऑक्टा-कोअर MediaTek Helio P70 प्रोसेसर देण्यात आलं आहे. याची इंटरनल मेमरी कार्डद्वारे 512 GB पर्यंत वाढवता येऊ शकतं.

फोटोग्राफीसाठी यात तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 13MP Primery Sensor, 2MP Depth Sensor आणि 2MP Micro Lense कॅमेरा देण्यात आला आहे. यात लेझर ऑटोफोकस सपोर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेराही देण्यात आला (Motorola One Macro Launch) आहे. याची बॅटरी 4000 mAh आहे. USB-C पोर्ट, USB 2.0, 3.5mm हेडफोन जॅक, FM रेडिओ आणि ब्लूटूथ 4.2 देण्यात आलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.