InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महाराष्ट्र बंद : पुण्यातील चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

- Advertisement -

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. महाराष्ट्र पुण्यात हिंसक वळण लागले. चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तर पुण्यात मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.

मराठा आरक्षणाबदल मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा

दरम्यान, नाशिकमध्ये ठिय्या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांच्या दोन गटांतच हाणामारी झाली. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे आंदोलन स्थळावरील स्टेजवर गेल्याने त्यांचे समर्थक व इतर मराठा आंदोकांमध्ये वाद झाला. क्षणातच बाचाबाचे रुपांतर हाणामारीत झाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद जास्त भडकला नाही. सध्या तेथे शांततेत आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र बंद : नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन

- Advertisement -

Loading...

आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक

सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागले आहे. लातूरमध्ये आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. संतप्त आंदोलकांनी धक्काबुक्की देखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे ही स्टंटबाजी ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.