Tiger 3 | सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज

मुंबई: सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटानंतर चाहत्यांची आवडती जोडी ठरली होती. त्यामुळे यांचा येणारा आगामी चित्रपट ‘टायगर 3’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहे. चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून सलमान खानने चित्रपटाची नवीन रिलीज डेट शेअर केली आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये सलमानने चित्रपटाचे रिलीज डेट सह त्याचा एक लुक देखील शेअर केला आहे. हा लुक चाहत्यांना खूप आवडत आहे.

टायगर 3 पोस्टर रिलीज

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर 3 चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. टायगर या फ्रेंचाईजीचा टायगर 3 हा चित्रपट आहे. यापूर्वी ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातली होती. या दोन्ही चित्रपटांमध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले होते. तर टायगर 3 या चित्रपटांमध्ये कॅटरिना कैफ आणि सलमान खान यांच्यासोबत इमरान हाश्मी देखील दिसणार आहे. रिलीज झालेल्या पहिल्या पोस्टरमध्ये सलमान खानचा एक डोळा दिसत आहे. त्यामध्ये असे दिसत आहे की तो स्वतःला शत्रूपासून लपून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी बाहेर पडला आहे. इंस्टाग्राम वर सलमान खानने या पोस्टला कॅप्शन दिले आहे, ” टायगर ची नवीन तारीख…दिवाळी 2023!. हा चित्रपट यशराज फिल्मच्या बॅनरखाली निर्मित केलेला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

टायगर 3ची रिलीज डेट

अभिनेता सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टायगर 3 या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. आणि त्याचबरोबर चित्रपटाची रिलीज डेट देखील शेअर केली आहे. यापूर्वी हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार होता. पण आता नवीन आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट आता पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. सलमान खानने शेअर केलेल्या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर मध्ये या चित्रपटाची रिलीज तारीख दाखवण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे सलमानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. टायगर 3 बरोबरच सलमान खान आता ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.