InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महाराष्ट्राच्या वाघाचं जोरदार स्वागत, ‘ठाकरे’ चित्रपटाचा फिवर

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेला ‘ठाकरे’ चित्रपट आज आपल्या भेटीस आला आहे. संपूर्ण महाराष्ट्र भर अनेक ठिकाणी ‘ठाकरे’ चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्या चाहत्यांनी तसेच शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी संपूर्ण चित्रपटगृहांचं बुकिंग केलं आहे.

आज सकाळी मुंबईतील वडाळ्याच्या कार्निव्हल चित्रपटगृहात भल्या पहाटे साडेचार वाजता चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो ला तुडुंब गर्दी झाली होती. या शोसाठी संपूर्ण सिनेमागृह सजवण्यात आलं होतं. पहाटे चार वाजता आधी पूजा करण्यात आली. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या हस्ते चित्रपटाचे उद्घाटन झाले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शोला सुरुवात झाली.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.