InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘अखेरपर्यंत टीम इंडियाने जी झुंज दिली, ते पाहून बरं वाटलं’; मोदींनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा

आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली. टीम इंडियाच्या पराभवावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली. हा परिणाम निराशाजनक आहे, मात्र, अखेरपर्यंत टीम इंडियाने जी झुंज दिली, ते पाहून बरं वाटलं, असं मोदी म्हणाले.

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर काल (9 जुलै) न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. मात्र, पावसाने या सामन्यात खोळंबा घातला आणि सामना त्या दिवसापूरता रद्द करावा लागला. त्यानंतर आज पुन्हा हा सामना खेळवण्यात आला. तेव्हा न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र, सोपं वाटतं असलेलं हे आव्हान भारतीय संघाला पेललं नाही.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply