मीराबाई चानूला शुभेच्छा देताना झालेल्या चूकीमुळे टिस्का चोप्राने मागितली माफी 

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावलं. तिच्या या कामगिरीचे कौतुक करत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या. यातच अभिनेत्री टिस्का चोप्राने देखील ट्विट केलं होतं. मात्र ट्विटसोबत टिस्काने मीराबाईचा फोटो शेअर करण्याऐवजी इंडोनेशियाईची वेटलिफ्टर आइसा विंडी कैंटिकाचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. मात्र आता टिस्काने यावर नेटकऱ्यांची माफी मागितली आहे.

टिस्काने ट्विट करत मीराबाई यांचा चुकीचा फोटो पोस्ट केल्याबद्दल माफी मागितली आहे. ‘तुम्ही माझ्या या चुकीची मजा घेतली, पण मी मनापासून माफी मागते. माझ्याकडून नकळत ही चूक झाली. याचा अर्थ असा नाही की मी मीराबाई यांचा आदर करत नाही.’ अशी आशयाची पोस्ट टिस्काने केली आहे.

टिस्काच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर टिस्काने ‘तारे जमिन पर’, ‘दिल तो बच्चा है जी’, ‘लव ब्रेक अप जिंदगी’ आणि ‘अंकूर अरोरा मर्डर केस’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. टिस्काने चित्रपटांबरोबरच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ‘कहानी घर घर की’ , ‘अस्तित्व एक प्रेम कहानी’ या मालिकेतील टिस्काच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा