InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मला हरवण्यासाठी पवारांना बीडमध्ये यावं लागतंय- पंकजा मुंडे

मला हरवण्यासाठी पवारांना बीडमध्ये यावं लागतंय यातच माझा विजय असून ज्या पक्षात नेत्या नेत्यात एकी नाही त्यांनी काय आम्हाला टक्कर द्यावी अशी खिल्ली उडवत मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या विजयी संकल्प मेळाव्यावर तसेच धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था खूप कठीण झाली असून पक्षातील च नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. त्यामुळे पवारांनी अगोदर पक्षाकडं लक्ष द्यावं. मग जिल्ह्याकडे असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिलाय.

गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी बीड इथं येऊन चक्क जाहीर सभा घ्यावी लागते हेच आमचं यश आहे.  स्व.गोपीनाथ मुंडे यांचा पराजय करण्यासाठी अख्ख तत्कालीन मंत्रीमंडळ जिल्ह्यात तळ ठोकून होतं. परंतु झालं काय तर मुंडेसाहेब हे लाखोच्या मताधिक्याने निवडून आले अशीच स्थिती ही यावेळी ही कायम राहील असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply