InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भुजबळांनाही भासतीये राज ठाकरेंची गरज..!

राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी आघाडीबाबत राज ठाकरे यांना आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘मोदींविरुद्ध लढण्यासाठी राज ठाकरे यांचीही गरज आहे. त्यांनीही आघडीत सहभागी व्हावे’ असा भुजबळ यांचा उद्देश आहे.

‘आगामी लोकसभेची निवडणूक म्हणजे मोदी विरुद्ध संविधानाची लढाई आहे. याकरिता ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह राज ठाकरे यांच्याही सहकार्याची गरज आहे. त्यामुळे किती जागा मिळतील, याचा विचार करण्यापेक्षा मोदींचा पराभव हाच उद्देश ठेवून सर्वांनी आघाडीत सहभागी व्हावे,’’ असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

मोदी यांनी मागील निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर मते मागितली होती. तेव्हा कुठेच राममंदिराचा विषय नव्हता. साडेचार वर्षांच काहीच विकास करता आला नसल्याने आता भाजपने राम मंदिराचा विषय पुन्हा उकरून काढला आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply