अखिलेश यादव यांना निवडून आणणे म्हणजे यूपीत ‘गुंडा राज’ परत येणे होय; अमित शहाचं टीकास्त्र

मथुरा : सध्या देशात निवडणुकीचं वारं जोरदार वाहू लागलं आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील निवडणूका सध्या देशात चर्चेच्या केंद्र स्थानी आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे. यावर आता उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका भारताचे भवितव्य ठरवतील, असे विधान केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केले आहे.

यानंतर यावेळी अमित शहा यांनीं सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यावरही सडकून टीका केली. अमित शहा म्हणाले कि, अखिलेश यादव यांना निवडून आणणे म्हणजे यूपीत ‘गुंडा राज’ परत येणे होय, असे शहा म्हणाले. यूपी आज प्रगती करत असून, हे यूपीच भारताचे भवितव्य ठरवेल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. ते मथुरेत बोलत होते.

एक वेळ होती जेव्हा गुंड आणि गुन्हेगारांनी अशी दहशत पसरवली होती की राज्य पोलिसही त्यांना घाबरायचे. महिला आणि तरुणींना बाहेर पडण्याची भीती वाटत होती. पण आता ते बदलले आहे. गुंड आणि गुन्हेगार आता पोलिसांबद्दल इतके घाबरले आहेत की, ते स्वेच्छेने आत्मसमर्पण करत आहेत. आम्ही उत्तर प्रदेशला वंशवाद आणि जातीवादा पासून दूर नेले आहे आणि विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा