नवीन वर्षात आघाडी सरकारला घालवायचे; रामदास आठवलेंचा संकल्प

पुणे : कोरेगाव भीमा येथे शनिवारी २०४ वा शौर्यदिन साजरा होत आहे. या निमित्ताने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, नितीन राऊत, संजय बनसोडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंत्री विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहचले होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही कोरेगाव भीमा येथे भेट देत विजयस्तंभाला मानवंदना दिली. १८१८ साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आला होता. त्यानंतर अनेकांकडून या ठिकाणी मानवंदना देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा येथे भेट देत विजयस्तंभाला मानवंदना दिली.

यावेळी बोलताना आठवले यांनी महाविकासाआघाडीवर निशाणा साधलाय. “नवीन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवायचा आहे. रिपब्लिकन पक्ष अतिशय मजबूत करायचा आहे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायचा आहे, असा माझा संकल्प असणार आहे,” असं आठवले यांनी सांगितलं आहे. ते भीमा कोरेगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या