काँग्रेसला डावलणं म्हणजे फॅसिस्ट वृत्तीला बळ देण्यासारखं, थोरातांची ममतांवर टीका

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत आल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर ममता बॅनर्जीं आणि शरद पवार यांची हि भेट देशात चर्चेचा विषय बनलीय. या भेटीनंतर देशात अनेक चर्चांना सुरुवात झालीय.

ममाताजींनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर निशाणा साधला होता. यूपीए अस्तित्वात नाही, असं त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जीं यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही हल्लाबोल केला होता. तसेच शरद पवार युपीएचे नेते होणार का? असा सवाल ममता बॅनर्जींना विचारण्यात आला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी भडकल्याचं पहायला मिळाल्या. ‘काय युपीए युपीए करता. युपीए नाहीये आता’, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

यावर आता काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपविरोधातील आघाडीबाबत सामनाच्या अग्रलेखाचे समर्थन थोरात यांनी केलं आहे. काँग्रेस हा जनमाणसातील राष्ट्रीय पक्ष आहे. तसेच काँग्रेस हा केवळ पक्ष नाहीतर विचार असल्याचेही थोरात म्हणाले.

काँग्रेस हा राज्यघटनेशी निगडीत असल्यामुळे तो शाश्वत पद्धतीनेच राहणार, वाईट दिवस येतील जातील पण तत्वज्ञान डावललं जाऊ शकत नाही. काँग्रेसला डावलणं म्हणजे विचारांना डावलणं आहे. या विचारांना डावलणं म्हणझे फॅसिस्टवृत्तीला ताकद देण्यासारखे आहे. अशा शब्दात थोरात यांनी ममतांवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा