InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार कडक कायदा करण्याच्या विचारात

गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकार मॉब लिंचिंगविरोधात कडक कायदा करण्याच्या विचारात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करु शकतात.

उत्तर प्रदेशच्या विधी आयोगाने मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी विशेष कायदा बनवण्यासाठी शिफारस केली आहे. आयोगाने याबाबतच्या शिफारसी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवल्या आहेत. नवीन कायदा बनल्यास त्यानुसार दोषींना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. याशिवाय मॉब लिंचिंग घटनेतील पीडित कुटुंबातील व्यक्तींना पाच लाखांची मदत केली जाणार आहे.

विधी आयोगाने 128 पानांचा अहवाल मुख्यंमत्र्यांना सादर केला आहे. या अहवालात मॉब लिंचिंगपासून बचावासाठी अनेक उपायही सांगण्यात आले आहेत. सध्या जे कायदे आहेत, ते मॉब लिचिंगच्या घटना रोखण्यासाठी पुरेसे नाहीत, असा अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply