‘आज शंभरावं वर्ष लागतंय, कदाचित विधात्याची ही इच्छा असावी’: बाबासाहेब पुरंदरे

मुंबई : आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा 99 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आज 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर पुरंदरेंनी माध्यमांशी संवाद साधला.  त्यावेळी शंभरावं वर्ष लागतंय. कदाचित विधात्याची ही इच्छा असावी. या काळात मी खूप शिकलो. शिकवण्याचा आव मी कधी आणला नाही, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले.

“मी खरंतर वेगळं असं काही केलं नाही. मला कसलंही व्यसन नाही इतकंच. आणखी किती वर्षे जगणार माहिती नाही. अजून दोन ते तीन वर्षे मिळाली तर इतकंच मागतो की मला आजारी पडू देऊ नकोस. पुढील आयुष्य मिळालं तर छान हसत-खेळत स्वावलंबी असावं,” असंही ते म्हणालेत.

तसेच, “वयाच्या 99 वर्षांमध्ये मी आनंदी आहे. पण समाधानी आणि तृप्त नाही. प्रकृतीने साथ दिली तर खूप काही लिहायची इच्छा आहे. सर्वांना रायगडावर घेऊन जायचं आहे,” असंही पुरंदरे पुढे म्हणाले.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या सोहळ्याचं आयोजन टाळत त्यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा