InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आज जगभरात साजरा केला जातोय जागतिक दूरसंचार दिवस

संचारच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि जगभरात याचे माहिती वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या 17 मे रोजी जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. म्हणून हा दिवस संचारच्या विकासासाठी समर्पित आहे.

21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून संदेश व संवाद माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. या श्रेणीत मोबाइल, इंटरनेट आले. यामुळे आतापर्यंत ‘जागतिक दूरसंचार’ नावे साजरा होणारा हा दिन जागतिक दूरसंचार व माहिती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 2006 मध्ये घेण्यात आला. तेव्हापासून हा दिन दरवर्षी साजरा होत आहे. टेलिफोनच्या आधी तारेने संदेश दिले जात होते. त्याचा विस्तार करण्यासाठी 17 मे 1865 ला इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली. यानिमित्ताने हा दिवस 1973 पासून साजरा होऊ लागला.

तसेच हा दिवस या हे ही संकेत देतो की आमच्या जीवनात संचार किती महत्त्वपूर्ण आहे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकासाला देखील प्रोत्साहित करतो.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.