InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच समविचारी पक्षांना एकत्र सोबत घेऊ

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा निर्णय  कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या  बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी समविचारी पक्षाच्या नेत्यांना आघाडीच्यावतीने पत्र दिले जाणार आहे. पत्राला प्रितसाद मिळाल्यानंतर छोट्या पक्षांशी चर्चा करावी, असेही बैठकीत ठरले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यापार्श्वभूमीवर दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सरकारी निवासस्थानी पार पडली. पहिल्या बैठकीत जागावाटपाचे सूत्र किंवा कोणत्या पक्षाला किती जागा यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.

- Advertisement -

शिवसेना-भाजपचा मुकाबला करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीसह, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, जनता दल, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट यांना पत्र लिहिण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती कॉंग्रेसच्या एका नेत्याने दिली.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.